जया जे वासना तेचि पु
21.
जया जे वासना तेचि पुरवीत । आपण तिष्ठत राहे द्वारी ॥१॥
बळीचिया भावा द्वारपाठ होय । सुदामाचे खाय पोहे सुखे ॥२॥
विदुराचे घरी आवडी कण्या खाय । हात पसरिताहे भाजी पाना ॥३॥
गौळीयाचे घरी करीतसे चोरी । काला स्वये करी गोपाळांसी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा नाटकी श्रीहरी । तोचि हा पंढरी भीमातटी ॥५॥
