वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 13. संत चांगदेव › 1. संत चांगदेव महाराज अभंग गाथा › 1. संत चांगदेव महाराज संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 46 › 2. उपदेशपर

उपदेशपर

🙏 13. संत चांगदेव · ABH-073768 · अभंग क्र. १९

19.
उपदेशपर

भावेंभक्ति करूनी वैराग्य जोडसी ।
तरी तू पावसी ब्रह्म सुख ॥१॥
ज्ञानतत्त्वीं करी करी हा विचार ।
निर्गुणीं आकार निरामय ॥२॥
चांग्या सोय धरी ज्ञानवटेश्वरी ।
मुक्ताई जिव्हारीं बोध करी ॥३॥

20.
ऐलाड हुडाचे पैलाड हुडाचे ।
जागवा जागवा हरीचे ॥१॥
भलेरे भलेरे दास गोपाळाचे ॥२॥
भक्तिबोधें बोधले साचे ।
चांगदेव म्हणे वटेश्वराचें ॥३॥

21.
सोहं होते तें कोहं जालें ।
निज विसरले काय सांगों ॥१॥
मार्ग चुकला विसर पडिला ।
वरपडा जाला विषयचोरा ॥२॥
वटेश्वर चांगा ज्ञानदीपें उजळला ।
सोहं शब्द लावियला बाईयानो ॥३॥

22.
मुक्त होतासि तो का ।
बद्ध जालासी आपल्या ।
बंधने आपण बांधलासी ॥१॥
सांडी बंधन सोय धरी गव्हारा ।
जाई मूळस्थाना आपुलिया ॥२॥
तेथींचा तेथें राही परीयेसी ।
चांगयाशीं बोले मुक्ताई॥३॥

23.
तुझा तू चुकलासी ।
गिवसुनी घेई सांगी देह ।
वासना नाही तें घेई ॥१॥
सोहं सोहं हा घेई ।
विचार है जाणतो वटेश्वर ॥२॥
शब्दातीत जाणोनि निरुते ।
चांगया वटेश्वरीं जन्म भरिते ॥३॥

24.
भ्रमराचे मरण कमळणीपुष्प ।
तैसें योगियां सेवी शेषमुख ॥१॥
आवडी वालमा डोळ्यांदेख ।
तैसें पाहे सुख ज्ञानदृष्टी ॥२॥
जोडिले सुख नव जाये ।
तैसा चांगा पाहे वटेश्वर ॥३॥

25.
मनसंकल्प शुद्ध नव्हे न्हवीं ।
सदोदित आहे चिदानंदी ॥१॥
मनाते बुडनी इंद्रियांत दंडुनी ।
भी हैं सोडुनी सोहं धरी ॥२॥
चांगावटेवरी सोहं झाला ।
अवघाचि बुडाला ज्ञानडोही ॥३॥

26.
नोवरीच्या गळा तुळशीच्या माळा ।
बन्हाडी सकळा तुम्ही व्हावे ॥१॥
मांडला आपुला मांडला आपुला ।
मांडला आपुला घराचार ॥२॥
घरमायेचं चीर वोहो माय नेसली ।
त्या आम्हा भली सोयरीक झाली ॥३॥
वटेश्वर नोवरीचे पाठी ।
रानकादिक गोष्टी करिताती ॥४॥

27.
देवी देवो जाला भावसी अबोला ।
निमोनि उरला आपपरे ॥१॥
आधी आप वाही मग पडे वाही ।
प्रपंच डोहीं बुडो नका ॥२॥
जंब नाही कृपा गुरु फळ बापा ।
तंव कैसेनी दीपा पावशील ।
मुक्ताई चांगया तत्त्वं तत्त्व लया ।
हरिभावीं माया हरपली ॥४॥

28.
मुक्त होतासि तो बंध पावसी ।
आपुल्या दोरी आपण बांधिलासी ॥१॥
सोप घरी मूळस्थान न सोडी ।
बंधन तोडी आलियारे ॥२॥
चांगा वटेश्वरी विनवितो दातारा ।
वायांची संसारा आणियलें ॥३॥

29.
मोळी विकुनी खीर वोखटी ।
आंबिल गोमटी बैसलिया ॥१॥
कन्हे बारा गांवे येरझारा करी ।
शेख पोट भरी कांट्यावरी ॥२॥
बुडी फळ लाभे तरी ।
शेंडिया का धावे वाया ।
का भोंवते भोंवे चांगा म्हणे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग