संसार तापे तापलो मी
21.
संसार तापे तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊनि तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥२॥
बहुता जन्मींचा झालो भारवाही । सुटिजे हे नाही वर्म ठावे ॥३॥
विढियेलो चोरी अंतर्बाह्यात्कारी । कणव न करी कोणी माझी ॥४॥
बहु पांगविलो बहु नागविलो । बहु दिवस झालो कासविस ॥५॥
तुका म्हणे आता धांव घाली वेगी । ब्रीद तुझे जगी दीनानाथा ॥६॥
