एव्हडिये दुरुनी आलो
21.
एव्हडिये दुरुनी आलो तुज कारणे भेटी दे । निधाने पांडुरंगे ॥
भेटी मज देसि आहे तुझी दासी । म्हणोनी आलो चरणापाशी ॥
तरी बापा तारिशिल मज । शरण आलो तुज ॥
राख माजी लाज । येहि काळी ॥
राखसिल लाज शरण आलो तुज । येइ चरणिचे रज बोधला म्हणे ॥
