जयराम स्वामीस कळला व
19.
जयराम स्वामीस कळला वृत्तांत ।
वत्सासी त्या अंतकाळ जाला ॥१॥
श्लोकार्ध म्हणोनि प्राण वत्स त्यजी ।
योग लाजला जी तयापुढे ॥२॥
मग सर्व श्रेष्ठ संत साधुजन ।
करीत कीर्तन वत्स नेले ॥३॥
दिंडी पताकाने मिरविले वत्स ।
गाय सवे तुज्च्छ मानी देह ॥४॥
हुंबरडा हाणोनी चाले मागे मागे ।
गाय अंतरंगे महादुःखी ॥४॥
पुरूनिया वत्स आले सर्व जन ।
करूनिया स्नान गृहा गेले ॥५॥
गाय वत्सापासी जाउनी हुंबरे ।
मागुती ते फिरे गृहासी ये ॥७॥
मज अवलोकिता मी तो अचेतन ।
माझा देही प्राण आढळेना ॥८॥
ऐसे दिवस चारी लोटलियावरी ।
प्रतिपदेमाझारी मध्यरात्री ॥९॥
बोलिला ब्राह्मण येऊनी सन्मुख ।
“सावध विवेक धरी बाई ॥१०॥
सावध सावध सावध तू मनी ।
ऐकोनी श्रवणी देह कापे ॥११॥
तव गाय नाही वत्स ना ते लोक ।
माय ते सन्मुख बैसलीसे ॥१२॥
बंधू पिता आणि भ्रतार बैसला ।
सोज्वळ लागला दीप असे ॥१३॥
तेथुनिया मन करोनी सावध ।
स्मरणी स्वतःसिद्ध चित्त केले ॥१४॥
बहेणि म्हणे देह सर्वही विकळ ।
परि ते निश्चळ चित्त माझे ॥१५॥
