वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 7. देवीच्या आरत्या

सुखसदने शशिवदने अंबे

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-090268 · अभंग क्र. २०

20.
सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने ।
गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने ॥
सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें ।
भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ॥ १ ॥

जय देवी जय देवी वो जय अंबे ।
कोल्हापुराधिस्वामिणि तुज वो जगदंबे ॥धृ. ॥
मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं ।
कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं ।
रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी ।
चिद्‌गगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ॥ जय. ॥ २ ॥

कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषें ।
पीतांबर सुंदर कसियेला कांसे ।
कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे ।
पदकमळलावण्यें अंबा शोभतसे ॥ जय. ॥ ३ ॥

झळझळ झळझळ झळकति तानवडें कर्णी ।
तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं ।
ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी ।
अद्‌भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ॥ जय. ॥ ४ ॥

अष्टहि भूजा सुंदर शोभतसे शोभे ।
झगझग झगझग झगति लावण्यगाभा ।
म्हगम्हग म्हगम्हग म्हगीत समनांची शोभा ।
त्र्यंबक मधुकर होउनि वर्णितसे अंबा ॥ ५ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग