भ्रतार म्हणतसे आम्ही
21.
भ्रतार म्हणतसे आम्ही की ब्राह्मण ।
वेदाचे पठण सदा करू ॥१॥
कैचा शूद्र तुका स्वप्नाची दर्शनी ।
बिघडली पत्नी काय करू ॥२॥
कैचा जयराम कैचा पांडुरंग ।
माझा झाल अभंग आश्रयाचा ॥३॥
आम्ही काय जाणो नाम हरिकथा ।
भक्ति हे तत्त्वता नसे स्वप्नी ॥४॥
कैचे संतसाधू कैची भावभक्ती ।
भिक्षुकाचे पंगति वसो सदा ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे चित्तात भ्रातरे ।
चिंतोनी निर्धारे विचारिले ॥६॥
