अनंत ब्रम्हांडे उदार
21.
अनंत ब्रम्हांडे उदारी । हरि हा बाळक नंदाघरी ॥१॥
नवल केव्हडे केव्हडे । न कळे कान्होबाचे कोडे ॥२॥
पृथ्वी जेणे तृत्प केली । त्यासी यशोदा भोजन घाली ॥३॥
विश्वव्यापक कमळापती । त्यासी गौळणी कडिये घेती ॥४॥
तुका म्हणे नटधारी । भोग भोगुनी ब्रम्हाचारी ॥५॥
कृष्ण जन्माचे अभंग समाप्त
