सांडी कल्पना उपाधी ।
21.
सांडी कल्पना उपाधी । तीच साधूला समाधी ॥१॥
वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥२॥
पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥३॥
एक मन चेष्टा करी । भूते बापुडी शेजारी ॥४॥
अवघी ईश्वराची करणी । काय तेथे केले कोणी ॥५॥
पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥
