वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

ध्येय ध्यान मनी उन्म

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089980 · अभंग क्र. १९

19.
ध्येय ध्यान मनी उन्मनी साधनी । लाविता निशाणी ध्यान मागे ॥१॥
ते रुप सधन गुणागुण संपन्न । ब्रह्म सनातन नांदे विटे ॥२॥
विठ्ठल नाम सार ऐसाचि निर्धार । मुक्ति पारावार ती अक्षरी ॥३॥
निवृत्ति निवांत राहिला निश्चिंत । केला मथीत पुंडलिका ॥४॥

अर्थ:
ध्येय ध्यान ध्याता ही त्रिपुटी निरास पावली की उन्मनी अवस्था प्राप्त होते. त्याची निशाणी हे योगी ध्यान मानतात.योग्यांचे ते ध्यान जे सर्व गुणांनी युक्त आहे तेच विटेवर उभे आहे. त्यामुळे श्री विठ्ठल नाम हेच सार असा निर्धार करुन ती मुक्ती प्राप्त झाली आहे. तोच हा परमात्मा आहे हे पुंडलिकाने सांगितल्यामुळे निवृत्तिनाथ निवांत राहिले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग