शुद्ध स्फटिके आपुलें
19.
शुद्ध स्फटिके आपुलें रुप देखे । कृष्ण तेणे हारिखें डोलतसे ॥१॥ देहाविदेहा आलिंगन स्वानंदे चुंबन । तये संधी मन हारपत ॥२॥ स्वस्वरुपीं भेटी थोर उल्हास पोटी । उन्मळींत दाष्टी निजरुप पाहे ॥३॥ हे जाणोनि माया धावे लावलाह्मा । उचलोनि कान्हाया दृश्य दावी ॥४॥ माझे रुप मज देई घालितो लोळणी । जननी नानागुणी बुझावीत ॥५॥ माया मोहं गुणाचे खेळणें । येथे कृष्ण म्हणे जीवेभावें ॥६॥ देह घटाबाहेरी न वचे मी मुरारी । श्रद्धा उष्ण भरी तावितसे ॥७॥ विषय पंचधारा देइन बा साकर । नाथिली करकर का करिसी ॥८॥ घेई स्तनपान वोरसु इंद्रिया गोरसु । मायेसी उदासू रुसूं नको ॥९॥ इच्छा माउलीची साय सावकाश खाय । गोगोरसाची माय मज चाड नाही ॥१०॥ तो तंव ठाईच्या ठाई म्या तव काही नेले नाही । निजरुप पाही जैंसे तैसे ॥११॥ तुझी पडलीया पडसाई असतांचि जाले नाही । नास्तिक तेचि डोई सबळ जाले ॥१२॥ तुझिया सांगाते करणे आणि भुते । अहंकारें थिते चोरुनि नेलीं ॥१३॥ दुजेपणें पाहता धरिता नये हाता । निजरुपा तत्त्वता काढोनि देई ॥१४॥ होसी चक्रचाळ घाइसी आळ । बाळलीळा खेळ निर्वाणीचा ॥१५॥ मज मायावेगळा नवचे बा गोपाळा । आपरुपी खेळा खेळू नको ॥१६॥ नेणो कैशी आवडी माया म्हणसी कुडी । भूली नव्हे खोडी तान्हुलिया ॥१७॥ हे नायके उत्तर म्हणे परती सर । निजरुपी साचार दावी मज ॥१८॥ यापरी कान्हया स्वरुपी थाया । बुझावितां माया वेढोनि गेली ॥१९॥ आपुलैया स्वप्रभा आपण पावे शोभा । सबाह्म कृष्ण उभा एकपणे ॥२०॥ माया मोहकता गुणाची वार्ता । कृष्णापणीं एकत्वेंची ॥२१॥ एक जनार्दनी निजीं निज मिळणी । सगुणी निर्गुणीं कृष्ण एक ॥२२॥
