चरण मिरवले विटेवरी द
21.
चरण मिरवले विटेवरी दोनी । ध्यातसे ध्यानी सदाशिव ॥१॥
तो हा पंढरीराव कर दोनी कटी । उभा असे तटी भीवरेच्या ॥२॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभले । ध्यानी मिरविले योगियाच्या ॥३॥
बंका म्हणे सर्व सिद्धीचा दातार । भक्ता अभयकर देत असे॥ ॥४॥
