अग्नी जाळी तरी न जळत
20.
अग्नी जाळी तरी न जळती पांडव । हृदयी माधव धरिला म्हणोनी ॥१॥
अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ । हृदयी देव बोल धरिला म्हणोनी ॥२॥
अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत । हृदयी सीताकांत म्हणोनिया ॥३ ।
अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद । हृदयी गोविंद म्हणोनिया ॥४॥
अग्नी जाळी तरी न जळे पै सीता । हृदयी रघुनाथ धरिले म्हणोनी ॥५॥
लंकेशी उरले बिभिषणाचे घर । हृदयी सीतावर धरिला म्हणोनी ॥६॥
नामा म्हणे स्वामी स्मरावे गोविंदा । चुके भव बाधा संसाराची ॥७॥
