वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 4. बुधवारचे अभंग

दोन्ही हात ठेवुनि कट

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073643 · अभंग क्र. २१

21.
दोन्ही हात ठेवुनि कटी । उभा भीवरेच्या तटी ।
कष्टलासीसाठी । भक्तीकाजे विठ्ठला ॥१॥
भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा ।
आम्हालागी सोपा । दैत्या काळ कृतांत ॥धृ॥
होतासी क्षीरसागरी । मही दाटली असुरी ।
म्हणोनिया घरी । गौळीयांचे अवतार ॥२॥
केला पुंडलिके गोवा । तुज पंढरीसि देवा ।
तुका म्हणे भावा । साटी हाती सांपडसी ॥३॥

बुधवार चे अभंग समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग