वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

श्रुतिस्मृति वचन तो

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075009 · अभंग क्र. २१

21.
श्रुतिस्मृति वचन तो । गुह्यागुह्य तो गे बाई ॥
जागता निजता तो । निज चेवविता तो गे बाई ॥
परात्परा तो । रखुमादेविवरू तो गे बाई ॥

अर्थ :
श्रुती व स्मृतीनी सांगितलेली वचने तोच असुन तोच गौप्याचे गौप्य आहे म्हणजेच गुप्ताचे गुप्तत्व आहे. ज्ञानाने जागवणारा व अज्ञानामुळे झोपवणारा तोच असुन तो जीवाला चेतवणारा (चैतन्य रुप)ही तोच आहे. मायेच्या पलिकडील तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग