वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ३, मंगलचरण तिसरे अभंग ५

श्रवणे कीर्तने झाले

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073109 · अभंग क्र. २१

21.
श्रवणे कीर्तने झाले ते पावन । सनकादिक जाण परम भक्त ॥१॥
जाली ते विश्रांती याचका सकळा । जीवी जीवनकळा श्रीमूर्तीरया ॥२॥
पादसेवने अक्रूर जाला ब्रम्हरूप । प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे ॥३॥
सख्यपणे अर्जुन नरनारायण । सृष्टी जनार्दन एकरूप ॥४॥
दास्यत्व निकट हनुमंते पै केले । म्हणुनी देखिले रामचरण ॥५॥
बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद । बिभीषणावरद चंद्रार्क ॥६॥
व्यास आणि वशिष्ठ वाल्मिकादिक । आणि पुंडलिक शिरोमणी ॥७॥
शुकादिक योगी रंगीले श्रीरंगी । परिक्षितीच्या अंगी ठसावले ॥८॥
उद्धव यादव आणि ते गोपाळ । गोपिकांचा मेळ ब्रम्हरूप ॥९॥
अनंत भक्त राशी तरले वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदी ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग