हाती घेऊनिया काठी ॥त
20.
हाती घेऊनिया काठी ॥तुका लागला कलेवरा पाठी ॥१॥
नेऊनि निजविले स्मशानी । माणसे जाळी ते ठिकाणी ॥२॥
काढिले ते ओढे । मागील उपचाराचे पुढे ॥३॥
नाही वाटो आला भेव । सुख दु:ख भोगिता देव ॥४॥
याजसाठी हे निर्वाण । केले कसियेले मन ॥५॥
तुका म्हणे अनुभव बरा । नाही तरी हस्तपाय चोरा ॥६॥
