जन्मांतरीचे सुकृत आज
21.
जन्मांतरीचे सुकृत आजी फळांसी आले ।
ह्मणोनी देखिले विठ्ठलचरण ।।१।।
धन्यभाग आजी डोळिया लाधले ।
म्हणुनी देखिले विठ्ठलचरण ।।२।।
धन्य चरण माझे या पंथ चालिले ।
म्हणुनी देखिले विठ्ठल चरण ।।३।।
येऊनिया देहासी धन्य झाले ।
म्हणुनि देखिले विठ्ठलचरण ।। ४ ।।
घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे ।
जन्मोजन्मी देखेन विठ्ठलचरण ।।५।।
