असा जी सोंवळे । आहा
2525.
असा जी सोंवळे । आहा तैसेचि निराळे ॥१॥
आह्मी नयो तुमच्या वाटा । काय लटिकाचि ताठा ॥धृपद॥
चिंतनाचि पुरे । काय सलगी सवे धुरे ॥२॥
तुका म्हणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥
अर्थ :
देवा तुम्हाला सोवळ्या स्थितीत राहायचे असेल आणि आमच्यापासून निराळे राहायचे असेल तर तसेच रहा. देवा तुमच्या निर्गुण निराकारी वाटेला आम्ही येणारच नाहीत कारण तेथे ब्रम्हज्ञानाचा खोटा अभिमान निर्माण होतो आणि त्या खोट्या ब्रम्हज्ञानाच्या अभिमानाला घेऊन काय करावे? आहो तुमच्या सारख्या निर्गुण निराकारी श्रेष्ठा बरोबर सलगी करून आम्हाला काय करायचे आहे आम्ही केवळ तुमचेच चिंतन करावे एवढेच आमच्यासाठी पुष्कळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या त्या सोवळ्या स्वरूपाची सेवा करणे मला आवडत नाही.
