वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

ॐ कार हा वृक्ष विस्त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086321 · अभंग क्र. २५५१

2551.
ॐ कार हा वृक्ष विस्तारला । चतुःशाखें थोर जाहला ।
पुढे षडंतर शाखें विस्तारला । आठरांचा तया मोहोर आला ॥१॥
उघडें माझे कोडे । जाणती न जाणती ते वेडे ।
पडले विषयांचें सांकडे । तया न कळे हे कोडे रे ॥२॥
चौर्‍यांयशी लक्ष पत्रे असती । सहस्त्र अठ्ठ्यायंशी पुष्पें शोभती ।
तेहतीस कोटी फळे लोंबती । ऐशी वृक्षाची अनुपम्य स्थिती रे ॥३॥
आदि मध्य अंत पाहता न लगे मुळ । एकवीस स्वर्ग सप्त पाताळ ।
एका जनार्दनी वृक्ष तो सबळ । उभा विटेवरी समुळ वो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग