वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

त्यागे भोग माझ्या ये

🙏 3. संत तुकाराम · ABH-077299 · अभंग क्र. २५११

2511.
त्यागे भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करू ॥१॥
आता असो तुझे पायी हे मोटळे । इंद्रिये सकळे काया मन ॥धृपद॥
सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळता भाव जाइल वाया ॥२॥
तुका म्हणे आता नको उजगरा । लपवी दातारा अंगी मज ॥३॥

अर्थ :
मी जर विषयांचा त्याग केला तर कालांतराने ते वैषयीक सुख पुन्हा माझ्या अंतःकरणात येईल त्यावेळी हे दातारा मी काय करू? त्यापेक्षा हे दातारा आता माझे सगळे इंद्रिय काया-वाचा-मन याचे गाठोडे तुझ्या पायाजवळ असू द्यावे. काय घ्यावे, काय नाही घ्यावे, विधिनिषेध कशाला म्हणतात हे जर समजून नाही घेतले तर माझा भक्ती भाव वायाला जाईल. तुकाराम महाराज म्हणतात हे दातारा आता मला लौकिकाची हाव राहिली नाही कुणी मला मान सन्मान द्यावा याची हाव राहिली नाही याविषयी माझी इच्छा राहिली नाही त्यामुळे तु मला आता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लपून टाक.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग