वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

दंड अन्यायाच्या माथा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077386 · अभंग क्र. २५३१

2531.
दंड अन्यायाच्या माथा । देखोनि करावा सर्वथा ॥१॥
नये उगे बहुता घाटू । सिसे सोनियांत आटू ॥धृपद॥
पापपुण्यासाठी । नीत केली आता खोटी ॥२॥
तुका म्हणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥३॥

अर्थ :
जो कोणी अन्याय करतो त्याची शिक्षेची पात्रता पाहून त्याला शिक्षा म्हणजे दंड करावा. जे निरपराध आहेत त्यांना कदापिही दंड करू नये म्हणजे सिसे सोन्यामध्ये कधीच आटवू नये. देवा पाप आणि पुण्य यासाठी जी वेदनिती तुम्ही तयार केली तिच आता तुम्ही खोटी केली. तुकाराम महाराज म्हणतात देवा यामध्ये दोष कोणाचा आहे आता तो तुम्हीच दाखवा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग