वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

जन्मांतरी शुद्ध नाही

🙏 3. संत तुकाराम · ABH-077179 · अभंग क्र. २५३५

2535.
जन्मांतरी शुद्ध नाही आचरण । यालागी चरण अंतरले ॥१॥
वोढवले संचित येणे जन्म पाहता । आता पंढरिनाथा कृपा करी ॥धृपद॥
पतितपावन ब्रिद साच करी देवा । यालागी कुढावा करी माझा ॥२॥
अपराधी पातकी दृष्ट दुराचारी । अहाळलो भारी संवसारे ॥३॥
कामक्रोध आदि कल्पनेच्या त्रासे । तुज न पवे ऐसे झाले देवा ॥४॥
हा ना तोसा ठाव झाला पांडुरंगा । नयेचि उपेगा काय करू ॥५॥
आपुलिया नावा धावणिया धावे । लवकरी यावे तुका म्हणे ॥६॥

अर्थ :
अनेक जन्मजन्मांतर पासून माझे आचरण शुद्ध नव्हते त्यामुळे हे देवा तुझे चरण मला अंतरले आहेत. परंतु या जन्मी जर पाहिले तर काहीतरी पूर्वपुण्यच माझ्याकडे ओढवले आहे त्यामुळे हे पंढरीनाथा आता माझ्यावर तुम्ही कृपा करा. देवा तुमचे पतितपावन असे ब्रीद आहे ते तुम्ही खरे करा आणि माझे रक्षण करा. देवा मी अपराधी, पातकी, दृष्ट, दुराचारी आहे संसाराच्या त्रासाने त्रस्त झालो आहे. देवा आधीच काम क्रोधाने आणि त्यात विविध प्रकारच्या कल्पनेने मी त्रासलो आहे त्यामुळे मी तुला प्राप्त करून घेणार नाही, असेच झाले आहे. पांडुरंगा धड नाही संसार, नाही धड परमार्थ त्यामुळे मला दोन्हीकडेही ठावठिकाणा राहिला नाही त्यामुळेच मी निरुपयोगी ठरलो आहे आता मी काय करू ते सांग? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही तुमची ब्रिदे खरी करा आणि लवकर माझ्याकडे तुम्ही धावत यावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग