उभा ऐल थडी । तेणे घा
2555.
उभा ऐल थडी । तेणे घालू नये उडी ॥१॥
पुढे गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ॥धृपद॥
दिसते आहारी । नये जाऊ ऐशावरी ॥२॥
अळसाची धाडी । तुका म्हणे बहु नाडी ॥३॥
अर्थ :
नदीच्या अलीकडे जो काठावर उभा आहे त्याने एकदम अविचाराने नदी च्या पाण्यात उडी घालू नये. नदीच्या पलीकडे जो गेला आहे त्याने काय उपाय केला आहे तोच उपाय आपण जाणून घ्यावा आणि त्याप्रमाणे करावे. हे माझ्या आटोक्यातील आहे असे समजून त्याच्या आहारी जाऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात हेही खरे असले तरी आपण जे काम करत आहोत त्यावर जर आपण काम करतोय परंतु आळसाने जर आपल्यावर धाड टाकली तर तो आपल्याला प्रतिबंध करून आपल्याला फार नाडीतो.
