धरा अधर जाली वोटंगणे
2533.
धरा अधर जाली वोटंगणे काई । जळे मळे ते धावें कवणे ठायी ॥१॥
ऐसा कोण्हीहा गुणीया मिळों का निरुता । भूते धरे धरी आपुलिया सत्ता ॥२॥
अग्नि हिवेला तापावे कोठे । पवना प्राणु नाही कवण लावी वाटे ॥३॥
गगन हारपलें पाहावेआं कवणे ठायी । मन मुळी लागले शांतीक ते पाही ॥४॥
स्वादें जेवणार गिळिला पै जाणा । चवी सांगावया सांग ते कवणा ॥५॥
एका जनार्दनी जाणे एक खुणे । त्यासी भेटी कोणी घ्या एकपणे ॥६॥
