वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

रात्रंदिवस जप होती स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086419 · अभंग क्र. २५३८

2538.
रात्रंदिवस जप होती साठ घटिका । संख्या त्याची ऐका निरनिराळी ॥१॥
दीड घटिका पळे दहा निमिष दोन । प्रथम ते स्थान आधारचक्र ॥२॥
साडेसोळाआ घटिका दहा पळे लेखा । निमिषे तीन देखा स्वाधिष्ठानी ॥३॥
दहा पळें देखा घटिका साडेसोळा असती । मणिपुर गणती निमिष चार ॥४॥
आणिक घटी पळें तितुकींची पाही । अनुहत ठायी निमिष पांच ॥५॥
पावणेतीन घटिका दहा पळें जाणा । विशुद्धींची गणना निमिष एक ॥६॥
अग्निचक्रावरी पावणेतीन घटिका । दीड पळ देखा निमिष एक ॥७॥
पळ आठ घटिका अडिचाची गणती । निमिष चवदा असती सहस्त्रदळीं ॥८॥
साहाशें ते सहस्त्र एकवीस होती । जनार्दनप्राप्ति एका उपायें ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग