बोलणें बोलता हेंचि द
2526.
बोलणें बोलता हेंचि दुर्घट । नुपजत लेकासी लाविला पाट ॥१॥
बोलू नये याचे सत्ते भेणे । मौनची राहणें हेंचि शहाणपण ॥२॥
तेथील संतति म्हणाल पवित्र । न म्हणता तरी घात कुळगोत्र ॥३॥
कांही एक वेद बोलू गेला बोली । चवंढाई चिरुनी तीन कोंडें गेलीं ॥४॥
श्लाघोनी भक्ती बोलू गेलीं तोडें । बोल बोल तंव नवखंडे ॥५॥
लडिवाळ भक्त बोलोनी हांसे । बोल बोले तंव लावियेलें पिसे ॥६॥
बोलावला येतो चढला अभिमाना । बोल बोले तंव दवडिलें राना ॥७॥
एका जनार्दनी मौनचीं घोटी । एकपणे तेंही घातले पोटी ॥८॥
