नाही तुम्हा काही लाव
2529.
नाही तुम्हा काही लाविले मागणे । कांटाळ्याच्या भेणे त्रासलेती ॥१॥
एखादिये परी टाळावी करकर । हा नका विचार देखो काही ॥धृपद॥
पायाच्या वियोगे प्राणासंवसाटी । ने घवेसी तुटी झाली आता ॥२॥
तुका म्हणे तुम्हा मागेन ते आता । हेचि कृपावंता चरणी वास ॥३॥
अर्थ :
देवा तुमच्या मागे आम्ही कोणत्याही प्रकारची मागणे लावले नाही तरीदेखील हे भक्त काही तरी मागतील या भीतीने तुम्ही त्रासला आहात आणि त्यामुळेच तुम्ही आमचा कंटाळा करत आहात? एखादे काहीतरी देऊन यांची आपल्या मागची ही करकर दूर करावी असा विचार तर तुम्ही करू नका. देवा तुमच्या पायाच्या वियोगाणे आमचा प्राण जाऊ पाहत आहे तुमच्या पायाचा वियोग आता व्हावा असे आम्हाला वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपावंता आता तुला एकच मागणे आहे ते हे की तुमच्या चरणांजवळ आमचा वास असावा.
