बाप तोचि माय होउनी आ
2527.
बाप तोचि माय होउनी आला पोटी । जातक वर्णिता गुंती पडली भेटी ॥१॥
बाप की माय म्हणावा पुत्र । भुललीया श्रुति करिता वृत्तान्त ॥२॥
मी बापापोटीं की बापु माझ्या पोटी । वर्णिता ज्योतिषी विसरले त्रिपुटी ॥३॥
एका जनार्दनी जातक मौनी । जन्मनाम ठेविले निःशब्द देउनी ॥४॥
