वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

स्वामीसेवका अबोला ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086169 · अभंग क्र. २५३०

2530.
स्वामीसेवका अबोला । ऐसा जन्मचि अवघा गेला ॥१॥
जन्मवरी जुने भाते । साधन शिऊं नेदी हातें ॥२॥
काम करु नेदी हाती । उसंत नाहे अहोरातीं ॥३॥
श्रद्धें विण अचाट सांगे । ढळॊं नेदी पुढे मांगें ॥४॥
न गणीं दिवस मास वरुषी । भागों जाता वहीच पुसी ॥५॥
चाव चावी करु नेदी । सगळें गिळवी त्रिशुद्धी ॥६॥
जो का ग्लानी साधन मागे । तेंचि बंधन त्यासी लागे ॥७॥
जो सेवा करी नेटका । त्यासी करुनी सांडी सुडका ॥८॥
झोंप लागों नेदी कांही । निजे निज निजवी पाही ॥९॥
एका जनार्दनी निज सेवा । जीवे ऊरूं नेदी जीवा ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग