वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

वृक्ष पाहता परतला आग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086432 · अभंग क्र. २५५२

2552.
वृक्ष पाहता परतला आगम । निगमा न कळे दुर्गम ।
वेदशास्त्रांसी निरुते वर्म । तो वृक्ष देखिला विठ्ठलनाम ॥१॥
माझे सोपे कोंडें । कान्होबा करी तुं निवाडे ।
अर्थ सखोल ब्रह्मांड । भक्तिभाव तयासि उघडे रे ॥२॥
साहांसी येथे न चाले मती । चार गुंतले न कळे गती ।
अठरा भाटीव वर्णिती । ऐशियासी न कळे स्थिति रे ॥३॥
चौर्‍यांयशीं लक्ष भुलले वाया । अठ्ठ्यायंशीं सहस्त्र भोगिता छाया ।
तेहतीस कोटी न कळे आयतया । एक जनार्दनी लागे पाया रे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग