परद्रव्य परकांता । न
2542.
परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्ता । आणि कर्मी तो तत्वता । बांधला नव जाय ॥१॥
ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढा । अवघा करी उकल ॥धृपद॥
सकळ आंबले ते अन्न । शोधी तेचि मद्यपान । विषमाने भिन्न । केले शुद्धाशुद्ध ॥२॥
तुका म्हणे नित । बरवे अनुभवे उचित । तरी काय हित । मोले घ्यावे लागते ॥३॥
अर्थ :
परद्रव्य आणि परनारी हे दोन विषय ज्याच्या चित्तात नसतात, तो इतर कोणत्याही पाप कर्माने बांधला जात नाही हे मी निश्चयाने सांगतो. अशा शुध्दवान माणसाला ब्रम्हाअनुभवाचा अनुभव विश्वासाने सांगावा. आणि एकातात बसून त्याच्यापुढे अधिकारी माणसाने सर्व गुह्यत ज्ञान उगड करून सांगावे. जो आंबलेले अशुद्ध अन्न खातो आणि त्याबरोबरच मद्यपानाचा जो शोध घेतो, त्याच्या मनात अनेक प्रकारचे कल्पित भेद निर्माण तयार होऊन हे शुद्ध आहे ते अशुद्ध आहे असे वैषम्य तयार होते. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची धर्म नित आहे त्यामुळे योग्य रीतीने ब्रम्ह अनुभव घेणे उचित आहे. आपले हित करून घेण्यासाठी काही मोल देऊन विकत घ्यावे लागते काय?
