वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

गो गोरसातीत स्वानंद

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086379 · अभंग क्र. २५३१

2531.
गो गोरसातीत स्वानंद साखरेसी । प्रेमे पेहें पाजीन संख्या सोयर्‍यासी ॥१॥
घेई घेई बाळा घोट एक । झणी पायरव होईल कुशलीं पडे तर्क ॥२॥
दृश्य न दिसे ते कांळी अवघे लावी होटीं । सद्युक्तीचें शिंपीवरी गिळी तैसे पोटी ॥३॥
अंतर तृप्त जाले सबाह्म कोंदलें । निज गोडिये गोडपणें तन्मय जाले ॥४॥
सदगुरु माउली पेहे पाजी अंगी भरला योग । तेणे देह बुद्धी समुळ केला त्याग ॥५॥
पंचभुतांचे अंगुलें सुवर्ण हारपले । माझे माझे म्हणत होते त्या गुणा विसरले ॥६॥
आतींची हारली भूक जाले सुख । निजनंदी पालखी पहुडलें स्वात्ममुख ॥७॥
पेहे पाजायाचे मिसे देतसे पुष्टी तुष्टी । एका सामावाला जनार्दना पोटी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग