एकाचि दिठी एकाचे डोळ
2528.
एकाचि दिठी एकाचे डोळे । एक चाले कैसे एकाचिये खोळे ॥१॥
सबाह्म अभ्यंतरी सारिखा चांग । दोघे मिळोनिया एकचि अंग ॥२॥
यापरि रिगाले अभिन्न अंगी । दोघे सामावाले अंगीच्या अंगी ॥३॥
ऐसे लेकीनें बापासी बांधलें कांकण । एका जनार्दनी केले पाणिग्रहण ॥४॥
