बहुत पुराणे बहुत मता
2513.
बहुत पुराणे बहुत मतांतरें । तयांच्या आदरे बोल नोहे ॥१॥
शाब्दिक संवाद नोहे हा विवाद । सबाह्म परमानंद हृदयामाजीं ॥२॥
नोहे हे कवित्व प्रेमरस काढा । भवरोग पीडा दुरी होय ॥३॥
नोहे हे कामानिक आहे पै निष्कामनिक । स्मरतां नासे दुःख जन्मांतरीजें ॥४॥
एका जनार्दनी माझा तो निर्धार । आणिक विचार दुजा नाही ॥५॥
