पंचक पंचकाचा पसारा प
2556.
पंचक पंचकाचा पसारा पांचाचा । खेळ बहुरूपियां पांचापासोनी ॥१॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश जाण । पंचकप्राण मन पांचांमाजी ॥२॥
इंद्रियपंचक ज्ञान ते पंचक । कर्म ते पंचक जाणे बापा ॥३॥
धर्म तो पंचक स्नान ते पंचक । ध्यान ते पंचक जाणे बापा ॥४॥
एका जनार्दनी पंचकावेगळा । पाहे उघडा डोळा विटेवरी ॥५॥
