अलक्ष अगोचर म्हणती व
2546.
अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष । तो दृष्टी न दिसे साक्ष । योगी म्हणती पाहिला लक्ष ॥१॥
कान्होबा तुझे कोडे । तुजपुढे केले उघडें । सांगता वेद जाहले वेडे रे ॥२॥
सहा अठरांची मिळणी । छत्तिसांचें घांतलें पाणी । तो वृक्ष देखिला नयनी रे ॥३॥
पंचाण्णवची एक शाखा । एका जनार्दनी वृक्ष देखा । अर्थ पाहता मोक्ष रेखा रे ॥४॥
