वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

पाडावी ते बरी । गाठी

🙏 3. संत तुकाराम · ABH-077202 · अभंग क्र. २५३३

2533.
पाडावी ते बरी । गाठी धुरेसवे खरी ॥१॥
नये मरो लंडीपणे । काय बापुडे ते जिणे ॥धृपद॥
लुटावे भांडार । तरी जया नाही पार ॥२॥
तुका म्हणे नावे । कीर्ती आगळीने ज्यावे ॥३॥

अर्थ :
थोर व्यक्तीच्या गाठी पाडुन घ्याव्यात आणि त्यांचाच आश्रय घ्यावा हेच खरे आहे. भित्र्या पणाने जगु नये व अशा बापुडवाण्या जगण्याला तरी काय अर्थ आहे काय? ज्याला अंतपारच नाही असे एखादे भांडार लुटावे. तुकाराम महाराज म्हणतात आपले नांव व आपली किर्ती विशेष रूपाने उरावी असेच जगावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग