वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

बाळ माते लातेवरी । म

🙏 3. संत तुकाराम · ABH-077067 · अभंग क्र. २५५३

2553.
बाळ माते लातेवरी । मारी तेणे संतोषे ॥१॥
सुख वसे चित्ता अंगी । ते हे रंगी मिळाले ॥धृपद॥
भक्षी त्याचा जीवमाग । आले भाग तो बरा ॥२॥
तुका म्हणे ॠणानुबंधे । सांगे सुदे सकळांसी ॥३॥

अर्थ :
लहान मुल आपल्या आईला लाथेवर लाथ मारते परंतु त्यामुळे आईला संतोषच वाटत असतो. दोघाच्याही चित्तात सुख बसलेले असते आणि दोघाचेही प्रेम रंग एकमेकात मिसळलेले असतात म्हणूनच. मुलाने सेवन केलेले अन्न उरलेले चांगले आहे हे समजुन तेच आई सेवन करते. तुकाराम महाराज म्हणतात हा सर्व ऋणानुबंधच आहे असे मी निसंकोच पणाने सर्वांना सांगत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग