वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

कोणाशी विचार करावा श

🙏 3. संत तुकाराम · ABH-077136 · अभंग क्र. २५२४

2524.
कोणाशी विचार करावा शेंवटी । एवढया लाभे तुटी झाल्यातरे ॥१॥
सांभाळितो शूर आला घावडाव । पुढे दिला पाव न करी मागे ॥धृपद॥
घात तो या नावे येथे अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥२॥
तुका म्हणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाय कार्‍या येतो ॥३॥

अर्थ :
मनुष्य देहासारखा एवढा मोठा लाभ आपल्या हाती आला आहे आणि तो जर हातून गेला मग शेवटी कोणाशी आणि कोणी विचार करावा? परमार्थ करत असताना ज्याच्या अंगावर अनेक संकटे येऊन तो सहन करतो तोच खरा परमार्थात शुर आहे व तो परमर्थात टाकलेले पाऊल पुन्हा मागे टाकत नाही. परमार्थामध्ये गोविंदाचे पाय अंतरले तर खरा घात तोच आहे. तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य देह म्हणजे संधीचे एक ठिकाण आहे या मनुष्य देहामध्ये जो उपाय जे कार्य आपण करू ते सफल होतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग