आमुची विश्रांति । तु
2550.
आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥१॥
हेचि एक जाणे । काया वाचा आणि मने ॥धृपद॥
पुढती पुढती नमन । घालूंनिया लोटांगण ॥२॥
नीच जना लोका । तिळले पायरीस तुका ॥३॥
अर्थ :
हे कमळापती आमची विश्रांती म्हणजे तुमचे चरण आहेत. आणि एवढे एकच तत्व काया, वाचा आणि मन जाणत आहे. तुम्हाला लोटांगण घालून सारखे सारखे तुम्हाला नमन करावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्यासमोर अनेक भक्त बसलेले आहेत त्यामध्ये मी सर्वांत नीच आहे आणि सर्वात खालच्या पायरीवर मीही तेथे आहे.
