वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

नव्हे ब्रम्हज्ञान बो

🙏 3. संत तुकाराम · ABH-080335 · अभंग क्र. १८१३

1813.
नव्हे ब्रम्हज्ञान बोलता सिद्ध । जव हा आत्मबोध नाही चित्ती ॥१॥
काय करिसी वाया लटिकाचि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥धृपद॥
मीच देव ऐसे सांगसी या लोका । विषयांच्या सुखा टोंकोनिया ॥२॥
अमृताची गोडी पुढिलां सांगसी । आपण उपवासी मरोनिया ॥३॥
तुका म्हणे जरि राहील तळमळ । ब्रम्ह ते केवळ सदोदित ॥४॥

अर्थ :
केवळ भराभर बोलण्याने ब्रम्‍हज्ञान होत नाही ; जोपर्यंत वृत्तीत आत्म्याचा ब्रम्‍हरूपाने निःसंदिग्ध अपरोक्ष साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत ' ब्रम्‍हज्ञान झाले ' असे म्हणता येत नाही. अनुभवावाचून खोटे पाल्हाळ काय करावयाचे आहे ? कारण, आपली विद्वत्ता दाखविणे म्हणजे केवळ श्रम आहेत. वैषयिक सुखावर दृष्टी ठेवून ' मीच देव आहे ' असे खोटेच पुढे बसलेल्या या भोळ्या श्रोत्यांना सांगतोस ; आणि त्यांना फसवितोस. आपण उपवासी राहून दुसर्‍याला मात्र अमृताची गोडी सांगतोस, हे आश्चर्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुझ्या चित्तातील संसाराची तळमळ थांबली, तर तू सर्वकाळ अखंड ब्रम्‍हरूप आहेसच. त्यासंबंधी व्यर्थ वाचाळपणा करण्याचे काय कारण आहे ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग