येव्हढें जया कृपेचे
1821.
येव्हढें जया कृपेचे करणे । रंक राज्यपदें मिरवती ॥१॥
तो हा कल्पतरु गुरुजनार्दनु । छेदी देहाभिमानु भवकंदु ॥२॥
कृपेचे वोरसें धांवे कामधेनु । तैसा माझा मनु वेधिलासे ॥३॥
एका जनार्दनी तयावांचुनी कांही । दुजे पाहाणें नाही मनामाजीं ॥४॥
