अनुभवें पंथे निरखिता
1818.
अनुभवें पंथे निरखिता देहभाव । देह नाही विदेही म्हणो वाव ।
लटिका नसतां साचार कैसा ठाव । गेला गेला समूळ भवाभाव ॥१॥
सदगुरुकृपे कल्याण ऐसे जाहलें । द्वैताद्वैत निरसुनी मन ठेलें॥ध्रु॥
कैंचा भाव अभाव उरला आता । देव म्हणे तोटा नाही भक्ता ।
समरस करिता तो हीन होता । शून्य भरला सदगुरु जनार्दन दाता ॥२॥
ऐशी खुण दाविता गुरुराव । नुरेचि तात्काळ देही सोहंभाव ।
सुखदुःखाचा भेद गेला वाव । एका जनार्दनी फिटला भेव ॥३॥
