धन्य धन्य श्रीगुरुभक
1799.
धन्य धन्य श्रीगुरुभक्त । गुरुचें जाणती मनोगत ॥१॥
गुरुचरणी श्रद्धा गाढी । गुरुभजनाची आवडी ॥२॥
गुरुचेंनाम घेता वाचे । कैवल्य मुक्ति तेथे नाचे ॥३॥
गुरुचें घेता चरणातीर्थ । भुक्ति मुक्ति पवित्र होत ॥४॥
गुरुकृपेचें महिमान । शरण एका जनार्दन ॥५॥
