माझा भाव तुझे चरणी |
1821.
माझा भाव तुझे चरणी | तुझे रूप माझे नयनी ॥१॥
सांपडलो एकमेका | जन्मोजन्मी नोहे सुटका ॥२॥
त्वा तोडिली माझी माया | मी जडलो तुझ्या पाया ॥३॥
त्वा मज केलेंरे विदेही | म्या तुज धरिले हृदयी ॥४॥
नामा म्हणे गा सुजाणा | सांग लटिके कोणे कोणा ॥५॥
