सांपडले होतो भ्रमाचि
1825.
सांपडले होतो भ्रमाचियां जाळीं । मायामोहकल्लोळीं भ्रमत होतो ॥१॥
परी जनार्दने केलोंसे मोकळा । दवडुनी अवकळा आशा तृष्णा ॥२॥
मीनाचिये परीतळमळ संसारी । माझे माझे भोवरीं दृढ धरित ॥३॥
ते परतें करुनी केलेंसे सरते । आपणापरौतें जाऊ नेदी ॥४॥
जनार्दनाचा एका लडिवाळ तान्हा । पाजी प्रेमपान्हा जनार्दन ॥५॥
