मनोभाव जाणोनि माझा ।
1798.
मनोभाव जाणोनि माझा । सगुणरुप धरिले वोजा । पाहुणा सदगुरुराजा । आला वो माय ॥१॥
प्रथम अंतःकरण जाण । चित्तःशुद्ध आणि मन । चोखाळोनी आसन । स्वामीसी केले ॥२॥
अनन्य आवडीचें जळ । प्रक्षाळिलें चरणकमळ । वासना समुळ । चंदन लावी ॥३॥
अहं जाळियल धूप । सदभाव उजळिला दीप । पंचप्राण हे अमूप । नैवेद्य केला ॥४॥
र्जतम सांडोनी दोन्ही । विडा दिला सत्त्वगुनी । स्वानुभवेंण रंगोनी । सुरंग दावी ॥५॥
एका जनार्दनी पुजा । देवभक्त नाही दुजा । अवघाचि सदगुरुराजा । होवोनि ठेला ॥६॥
