सहस्रनामाचे वाटगे |
1830.
सहस्रनामाचे वाटगे | खांदी घेतले नेटगे ॥१॥
देवा पाती तुझी देवा पाती तुझी | सरकत माझी भक्तिभावे ॥२॥
पंढरिये गेलो हाटा | दुकान मांडिले वाळवंटा ॥३॥
वैष्णवांची भरली सात | गिन्हाईक पातले बहुत ॥४॥
विकरा होतसे नामाचा | लाभ जाला त्या विठ्ठलाचा ॥५॥
नामा देवूनि दुबळा | विठ्ठले दिधले भांडवला ॥६॥
