आषाढी कार्तिकी विसरू
1811.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगतसे गुज पांडुरंग ॥१॥
पतित पावन मी तो आहे खरा | तुमचेनि बरा दिसतसे ॥२॥
तुम्ही जाता गांवा हुरहुर माझे जीवा | भेटाल केधवा मजलागी ॥३॥
धांवोनिया देव गळा घाली मिठी | स्फुंदस्फुंदून गोष्टी बोलतसे ॥४॥
तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणि नामयासी ॥५॥
आत्मज्ञानप्राप्ती.
